लोकलमध्ये अश्‍लील कृत्य करणाऱ्या तरुणाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

राजू पप्पू असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. मे महिन्यात ही धक्कादायक घटना घडली होती. बोरिवलीहून लोकलने चर्चगेटकडे एक तरुणी प्रवास करीत होती. त्या वेळी महिलांच्या डब्याशेजारी असलेल्या अपंगांच्या डब्यात राजू चढला. त्याने महिला प्रवाशांना पाहून शिवीगाळ करीत अश्‍लील कृत्य केले होते.

मुंबई - अपंगांच्या डब्यातून प्रवास करताना महिलांकडे पाहून अश्‍लील कृत्य करणाऱ्या तरुणाला रेल्वे पोलिसांनी अटक केली. तब्बल महिनाभर शोध घेऊन पोलिसांनी आरोपीला अखेर गजाआड केले. 

राजू पप्पू असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. मे महिन्यात ही धक्कादायक घटना घडली होती. बोरिवलीहून लोकलने चर्चगेटकडे एक तरुणी प्रवास करीत होती. त्या वेळी महिलांच्या डब्याशेजारी असलेल्या अपंगांच्या डब्यात राजू चढला. त्याने महिला प्रवाशांना पाहून शिवीगाळ करीत अश्‍लील कृत्य केले होते. त्याने तरुणीला अत्याचार करण्याची धमकीही दिली. त्या वेळी तातडीने तरुणीने रेल्वे नियंत्रण कक्षात फोन करून मदत मागितली; मात्र तिला प्रतिसाद मिळाला नव्हता.

तरुणीने सोशल साइटवर घडलेल्या प्रकाराची माहिती व आरोपीचा फोटो प्रसिद्ध केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. बोरिवली रेल्वे स्थानकात त्याला अटक करण्यात आली असून, त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

Web Title: mumbai news local train crime