विनामास्क दिसाल तर दंड निश्चित; 14 दिवसात एकूण 2 हजार 558 प्रवाशांवर कारवाई

विनामास्क दिसाल तर दंड निश्चित; 14 दिवसात एकूण 2 हजार 558 प्रवाशांवर कारवाई

मुंबई : राज्य आणि रेल्वे प्रशासनाच्यावतीने प्रवाशांना लोकल प्रवास करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. विना मास्क प्रवास करू नये, अशी रेल्वे स्थानकात, लोकलमध्ये उद्घोषणा केली जात आहे. मात्र काही प्रवाशांकडून मास्क घालण्यास कंटाळा केला जातोय. तर, काही प्रवासी चुकीच्या पद्धतीने मास्क घालत आहेत. अशा प्रवाशांवर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाद्वारे कारवाई केली जात आहे. मागील 14 दिवसात एकूण 2 हजार 558 प्रवाशांवर कारवाई करून 3 लाख 28 हजार 500 रुपयांची दंड वसुली केली आहे.

सर्वसामान्य प्रवाशांना ठराविक वेळेत लोकल प्रवास करण्याची मुभा दिली आहे. यावेळी कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून केले होते. मात्र काही प्रवासी विना मास्क प्रवास करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी महापालिका कर्मचारी तैनात केले आहेत. मात्र  कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्याने काही प्रवासी दंड न भरता बिनदास्त प्रवास करत आहे. तर, काही प्रवासी दंड भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याचे स्वरूप नंतर भांडण होत आहे. त्यामुळे अखेर स्थानकावरील रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी येऊन कारवाई करत आहेत. 

राज्य सरकारच्या निर्देशानुसार ठराविक वेळेत लोकल प्रवास सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला केला आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वे मार्गावर, मध्य रेल्वे मार्गावरील मुख्य मार्गिकेवर 100 टक्के क्षमतेने आणि इतर मार्गावर 95 टक्के क्षमतेने लोकल धावत आहेत.  त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरुन सुमारे 20 ते 22 लाख प्रवासी तर, पश्चिम रेल्वे मार्गावरून सुमारे दररोज 18 ते 20 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. 

पश्चिम रेल्वे मार्गावरील विना मास्क प्रवासी आकडेवारी ( केसेस आणि दंड )                     

  • 1 फेब्रुवारी          571        1, 14,200
  • 2 फेब्रुवारी          544         1,14,400
  • 3 फेब्रुवारी         226        50,900
  • 4 फेब्रुवारी         235          47,000
  • 5 फेब्रुवारी         142         28,400
  • 6 फेब्रुवारी         158         31,600
  • 7 फेब्रुवारी         202         40,400
  • 8 फेब्रुवारी         138         28,200
  • 9 फेब्रुवारी          9            35,400
  • 10 फेब्रुवारी       140         28,000  
  • 11 फेब्रुवारी         94          18,800
  • 12 फेब्रुवारी         14           2,800
  • 13 फेब्रुवारी          75          15,000
  • 14 फेब्रुवारी          10          2,000

एकूण  -   2, 558    3,28,500

mumbai news local train if found without mask strict fine will be taken


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com