दोन लाखांची रोकड लुटणारे चौघे गजाआड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई - गेल्या महिन्यात बारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडील दोन लाख 42 हजारांची रक्कम लुटणाऱ्या चौघांना गुरुवारी (ता. 22) एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अखिलेश रामलाल यादव, सूरज लालचंद सिंग, महेश बहादूर चौरसिया, राजेश दयाराम शर्मा अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (ता. 26) पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील दोन आरोपी फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

अंधेरी पूर्वच्या पंपहाउसजवळ एक बार आहे. फेब्रुवारीत या बारचा कर्मचारी दोन लाख 42 हजारांची रक्कम घेऊन जात होता. मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी त्याच्या हातावर वार करून रक्कम घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: mumbai news loot crime criminal arrested

टॅग्स