अमिताभ बच्चन लीलावती रुग्णालयात

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

मुंबई - अभिनेते अमिताभ बच्चन यांना शुक्रवारी सायंकाळी अचानक लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना मान व पाठीच्या मणक्‍यात त्रास सुरू झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याचेही सांगण्यात येते.

अमिताभ "ठग्ज ऑफ हिंदुस्तान' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. त्यांनी गुरुवारी (ता. 8) रात्री उशिरापर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण केले. आज पहाटे त्यांनी ट्‌विट करून विश्रांती घेणार असल्याचे म्हटले होते. पण आज सायंकाळी सहाच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: mumbai news maharashtra news amitabh-bachchan sickness lilawati hospital