'महास्वयम्‌' पोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

मुंबई - कौशल्य विकास विभागाच्या महारोजगार, एमएसएसडीएस व महास्वयंरोजगार या तिन्ही वेब पोर्टलचे एकत्रीकरण करून "महास्वयम्‌' हे वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. यापूर्वी कौशल्य विकास (एमएसएसडीएस), रोजगार (महारोजगार) व उद्योजकता (महास्वयंरोजगार) याबाबत तीन स्वतंत्र वेब पोर्टल होती.

मुंबई - कौशल्य विकास विभागाच्या महारोजगार, एमएसएसडीएस व महास्वयंरोजगार या तिन्ही वेब पोर्टलचे एकत्रीकरण करून "महास्वयम्‌' हे वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. यापूर्वी कौशल्य विकास (एमएसएसडीएस), रोजगार (महारोजगार) व उद्योजकता (महास्वयंरोजगार) याबाबत तीन स्वतंत्र वेब पोर्टल होती.

या वेब पोर्टलवर प्रशिक्षितांची यादी असेल. ज्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे त्या बेरोजगारांना नोंदी करता येतील; तसेच उद्योगांना कामगारांच्या मागणीप्रमाणे नोंदणी करता येईल. उमेदवारास एकाच ठिकाणी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताविषयक माहिती मिळेल. प्रशिक्षण व प्रशिक्षणाचे देयक त्याचप्रमाणे रोजगाराबाबत संपूर्ण माहिती भरण्याची सुविधा या वेब पोर्टलवर आहे. उद्योजकास सीएनव्ही ऍक्‍टनुसार रिक्त असलेली पदे दाखवणे, प्रसिद्धी देणे, योग्य उमेदवाराची निवड तयार करणे, मुलाखतीचा एसएमएस पाठवणे, अनिवार्य विवरणपत्र सादर करणे इत्यादी सुविधा या वेब पोर्टलवर आहेत.

उमेदवारांना नोकरीबाबतची माहिती एकाच क्‍लिकवर; तसेच एसएमएस मिळण्याचीही सुविधा आहे.

उमेदवार व उद्योजकांना रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी; तसेच उमेदवार, उद्योजकांना प्रशिक्षण नोंदणी सुविधा देण्यासाठी या वेब पोर्टलची मदत होईल. उमेदवारास नोंदणी, रोजगारांची माहिती, अर्ज भरणे, प्रशिक्षण स्वयंरोजगाराबाबतची माहिती, सरकारच्या कौशल्य विकास योजनेत सहभागी होणे, प्रशिक्षण शुल्क भरणे ही कामे "ईसीएस' पद्धतीने या वेब पोर्टलद्वारे करता येतात. कौशल्य मिळवलेले उमेदवार, नोकरी लागलेले उमेदवार आणि स्वयंरोजगार सुरू केलेल्या व्यक्तींची माहितीही यावर पाहता येते. कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, कौशल्य विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, आयुक्त ई. रवींद्रन यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेब पोर्टलचे उद्‌घाटन केले.

Web Title: mumbai news mahaswayam portal inauguration by chief minister