महेता, देसाईंचे राजीनामे हवेत - विखे पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई - 'एमआयडीसी'साठी अधिसूचित करण्यात आलेले नाशिक परिसरातील भूखंड अनावश्‍यक असल्याचे दाखवून मुंबईतील स्वस्तिक बिल्डरसाठी विनाअधिसूचित केल्याचा आरोप करत आज विरोधकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा मागितला. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या राजीनाम्याबरोबरच सुभाष देसाई यांचा राजीनामा मागत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज "एमआयडीसी' गैरव्यवहाराची "एसआयटी'मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. विधानसभेचे कामकाज या मागणीमुळे दोनदा तहकूब करण्यात आले, तर विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.
Web Title: mumbai news maheta, desai resign demand