शेट्ये मृत्यू प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या तुरुंग अधीक्षक मनीषा पोखरकरसह सहा जणांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात आज अर्ज दाखल केला. 

मंजुळाचा मृत्यू तुरुंगातील पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याची तक्रार कैदी महिलांनी केली आहे. पोलिसांनी याबाबत पोखरकर यांच्यासह बिंदू नाईकडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे यांना अटक केली आहे. किल्ला न्यायालयात झालेल्या रिमांडच्या सुनावणीत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे, असे सांगितले होते. त्यामुळे सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. 

मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच पोलिसांना मंजुळाच्या मृत्यूच्या तपासाबाबत खडेबोल सुनावले आहेत. शौचालयात पडल्यामुळे तिला जखमा झाल्या, असा अजब दावा पोलिसांनी केला आहे. जामीन अर्जावर ऑगस्टमध्ये सुनावणी होईल.

Web Title: mumbai news Manjula Shetty case high court