मनोहर पर्रीकरांवर आता अमेरिकेत उपचार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना सोमवारी (ता. 5) लीलावती रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार ते अमेरिकेत पुढील उपचारांसाठी जात आहेत, अशी माहिती गोवा सीएम या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. 

14 फेब्रुवारीला अन्न विषबाधा झाल्यानंतर गोव्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी गेलेल्या पर्रीकर यांना तेथील डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर गोव्यात सुरू असलेल्या अधिवेशनासाठी पर्रीकर गोवा येथे परत गेले. त्याचवेळी त्यांनी पुढील उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात पुन्हा येणार असल्याचे सांगितले. रविवारी पर्रीकरांनी मुंबईतील डॉक्‍टरांच्या सल्ल्लानुसार, पुढील उपचाराची दिशा ठरेल, असे जाहीर केले. त्यानुसार ते सोमवारी मुंबईत दाखल झाले. मंगळवारी ट्विटर अकाऊंटवरून लीलावती रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या सल्ल्लानुसार अमेरिकेत उपचारांसाठी जात असल्याचे जाहीर केले. पर्रीकर यांना स्वादुपिंडाला आजार झाल्याचे कळते. 

Web Title: mumbai news Manohar Parrikar health