मराठी अभ्यास केंद्राच्या बैठकीला मोठा प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई - मराठी माध्यमातून मुलांना शिक्षण दिल्यास त्यांना चांगले इंग्रजी येणार नाही, अशी भीती अनेक पालकांना असते. मात्र, मराठी माध्यमात शिकूनही आमच्या पाल्याचा इंग्रजी हा विषय इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या तोडीचा असतो, असे मत पालकांनी मांडले. काही वर्षांत विद्यार्थी नसल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे मराठी अभ्यास केंद्राने घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. 

शीव येथील डी. एस. हायस्कूलमध्ये ही बैठक झाली. या वेळी मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील पालक मुलांसह उपस्थित होते. मराठी शाळा टिकवण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न सुरू होते, मात्र फारसे यश मिळू शकले नाही, अशी खंत व्यक्त करतानाच मराठी शाळा टिकवण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्‍यक असल्यामुळेच ही बैठक घेण्यात आली, असे अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले. ई-लर्निंगवर भर, विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना बोलण्याचाही सराव, शिक्षकांनाही इंग्रजीचे कौशल्य शिकवणे, यामुळे शाळेचा पट काही वर्षांत वाढला, असा अनुभव शाळेचे संचालक राजेंद्र प्रधान यांनी सांगितला. 

Web Title: mumbai news marathi