मराठी विषयाच्या दोन पदांना "सोमय्या'मध्ये शासनमान्यता 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - के. जे. सोमय्या महाविद्यालयात महाविद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजे 1960 पासून मराठी विषयासाठी पूर्ण वेळ दोन पदे मंजूर आहेत; मात्र महाविद्यालयाने संचमान्यता नसल्याने मीरा कुलकर्णी यांचा कार्यभार काढून घेतला आहे. याविरोधात शिक्षण विभागाने याबद्दल तातडीची कारवाई करावी, अन्यथा येत्या गुरुवारी (ता.21) सोमय्या महाविद्यालयातील तिन्ही कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक एका दिवसाच्या रजेवर जाणार असून व्यवस्थापनाविरोधात धरणे धरण्यात येणार आहे.

मुंबई - के. जे. सोमय्या महाविद्यालयात महाविद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजे 1960 पासून मराठी विषयासाठी पूर्ण वेळ दोन पदे मंजूर आहेत; मात्र महाविद्यालयाने संचमान्यता नसल्याने मीरा कुलकर्णी यांचा कार्यभार काढून घेतला आहे. याविरोधात शिक्षण विभागाने याबद्दल तातडीची कारवाई करावी, अन्यथा येत्या गुरुवारी (ता.21) सोमय्या महाविद्यालयातील तिन्ही कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक एका दिवसाच्या रजेवर जाणार असून व्यवस्थापनाविरोधात धरणे धरण्यात येणार आहे. त्या काळात विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला शिक्षण खाते; तसेच महाविद्यालयाचे प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने केले आहे. 

शिक्षण उपसंचालक विभागाने 2016-17 साठी मराठी विषयासाठी दोन पदे मंजूर झाल्याचे पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे जोपर्यंत 2017-18 च्या संचमान्यतेचे पत्र येत नाही, तोपर्यंत आधीची मान्यता गृहीत धरावी लागते. दरवर्षी सुधारित संचमान्यतेचे पत्र ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येते. त्याचप्रमाणे 13 जानेवारी 2017 मध्ये प्रा. कुलकर्णी यांना कायम केले होते. कायम असलेल्या शिक्षिकेला विद्यार्थीपट कमी झाल्याचे सांगून कामावरून काढता येत नाही; मात्र तरीही महाविद्यालय प्रशासनाने तिला कामावरून काढून टाकले आहे. हे अत्यंत अन्यायकारक आहे. मराठी संपवण्याचा हा घाट असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष एस. एल. दीक्षित यांनी सांगितले. तसेच महाविद्यालयीन प्रशासन; त्याचप्रमाणे सोमय्या महाविद्यालयाच्या प्राचार्याही शिक्षण उपसंचालकांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. "सकाळ'ला या संदर्भातले शासनाच्या आदेशाचे पत्र संघटनेने उपलब्ध करून दिले आहे. 

Web Title: mumbai news marathi