मातृभाषेतील शिक्षणाविषयी पालकांचे महासंमेलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

मुंबई - मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व, इंग्रजी भाषा आणि इंग्रजी माध्यम यातला फरक पटवून देण्यासाठी व मराठी माध्यमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी मुंबईत मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुला-मुलींच्या पालकांचे महासंमेलन नोव्हेंबरमध्ये मराठी अभ्यास केंद्र घेणार आहे. या महासंमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर 22 व 29 जुलैला प्राथमिक बैठका घेण्यात येतील. 

अनेक वर्षांत मराठी शाळा बंद पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या शाळा विद्यार्थी नसल्याने बंद पडू नयेत, सर्वांगीण विकासासाठी संबंधित शाळेतील मुला-मुलींच्या पालकांनी निर्णायक भूमिका घेतल्यास समाज आणि सरकारी स्तरावर सकारात्मक संदेश जावा यासाठी पालकांच्या सक्षमीकरणाची गरज ओळखून या बैठका घेण्यात येत आहेत.

Web Title: mumbai news marathi education