मराठी नाट्य परिषदेची 4 मार्चला निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक चार मार्चला होणार असून, निवडणुकीचा निकाल सात मार्चला जाहीर होईल, अशी माहिती परिषदेचे प्रमुख निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी दिली. गेल्या वेळी झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा निवडणुकीच्या नियमावलीचे कठोर पालन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दळवी म्हणाले, 'अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष (प्रशासन आणि उपक्रम), प्रमुख कार्यवाह, सहकार्यवाह व 19 कार्यकारी समिती सदस्य या पदांसाठी ही निवडणूक होईल. राज्यभरात 19 ठिकाणी ही निवडणूक होईल. त्यात 23 हजार 489 मतदार मतदान करतील. मतदानास पात्र सभासदांची सुधारित यादी, नियामक मंडळाच्या जिल्हावार प्रतिनिधींची संख्या, जिल्हावार निवडणूक अधिकाऱ्यांची नावे आदी माहिती 9 जानेवारीपर्यंत पाठवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेत अनुचित प्रकार झाल्यास त्याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला जाईल.''

नियामक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षांसाठी तीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अध्यक्षांनी दोन वर्षांच्या कामाचा आराखडा सादर करावा. बालनाट्यासाठीही दीड लाख रुपयांची तरतूद केल्याचे दळवी यांनी सांगितले.

निवडणुकीचा कार्यक्रम
- मध्यवर्ती कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याची
किंवा मेलद्वारे अर्ज पाठवण्याची मुदत - 9 ते 18 जानेवारी
- अर्जांची छाननी - 19 जानेवारी
- उमेदवार यादी प्रसिद्धी - 22 जानेवारी
- अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत - 25 जानेवारी
- संकेतस्थळावर मतदान केंद्रांची यादी - 31 जानेवारी
- मतदान - 4 मार्च
- निकाल - 7 मार्च
- निवडणुकीसंदर्भातील तक्रारींची मुदत - 20 मार्च
- तक्रारींचा निपटारा - 25 मार्च

Web Title: mumbai news marathi natya conuncil election