शेतकऱ्यांना कर्ज मिळायला हवे : राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणे, हमी भाव मिळणे आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, या मागण्यांवर ठाम असल्याचे आज (शनिवार) खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

मुंबई : शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणे, हमी भाव मिळणे आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, या मागण्यांवर ठाम असल्याचे आज (शनिवार) खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

शेतकरी समन्वय समितीची बैठक आज (शनिवार) मुंबईतील माहिमच्या शषतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, रघुनाथदादा पाटील, अजित नवले, बी जी कोळसे पाटील आदी उपस्थित होते. "खरिपाचा वित्तपुरवठा अडचणीत' या सकाळमधील बातमीवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी सकाळचा उल्लेख करत खरीपासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, अशी मागणी केली. त्यामुळे रविवारी दुपारी अतिथीगृहात सरकारच्या विशेष समितीशी होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा समाविष्ट करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणे, हमी भाव मिळणे आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, या मागण्यांवर ठाम असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
जनतेच्या परिक्षेत भाजप 'ढ' ठरली: संजय राऊत
नवी मुंबईत रिक्षा चालकांकडून बस चालक व वाहकाला मारहाण
शिवराजसिंह चौहानांचे उपोषण सुरु; शेतकऱ्यांशी चर्चेस तयार
धुळे: पावसामुळे तामसवाडीजवळ रस्ता गेला वाहून
पुणे: मोदी फेस्टच्या कार्यक्रमाला खासदार, आमदारांची दांडी
लष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार
महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा
धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
 

Web Title: mumbai news marathi news farmer strike raju shetty maharashtra news