सेंट जोसेफ शाळेवर दुसऱ्या तक्रारीची मागणी फेटाळली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

पनवेल : सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत खांदेश्‍वर पोलिसांनी काल (ता. 16) जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांची जबानी घेतली. या प्रकरणाबाबत दुसरी पोलिस तक्रार दाखल करण्याची पालकांची मागणी
पोलिसांनी फेटाळली.

पनवेल : सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत खांदेश्‍वर पोलिसांनी काल (ता. 16) जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांची जबानी घेतली. या प्रकरणाबाबत दुसरी पोलिस तक्रार दाखल करण्याची पालकांची मागणी
पोलिसांनी फेटाळली.

सेंट जोसेफ शाळेने बेकायदा फी वाढ केली होती. यासंदर्भात पालकांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नव्हती. त्यानंतर शिक्षण उपसंचालक व शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागण्यात आली; मात्र त्यानंतरही पालक व मुलांना शाळेकडून मानसिक
त्रास सहन करावा लागला. वाढीव फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर प्रॉब्लेमेटिक पॅरेंट असा शेरा देणे, वाढीव फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र तुकडी, एकट्या विद्यार्थिनीला वर्गात बसविणे, परीक्षा न घेणे आदी प्रकार घडले
होते. याविरोधात पालकांनी बालसंरक्षण विभागाकडे तक्रार केली होती; मात्र या विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र अहवाल दिले. त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल केली नव्हती.

जिल्हा बालसंरक्षण अधिकारी बाळकृष्ण रेड्डी यांच्या अहवालावर काही पालकांनी आक्षेप घेतला होता. काही दिवसांपूर्वी शाळेतील एका विद्यार्थिनीला शिक्षिकेने केलेल्या जबर मारहाणीमुळे खांदेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात
आली. या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांबरोबर पालकांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत आयुक्त शिंदे यांनी बालकृष्ण रेड्डी यांची कानउघाडणी केली. तसे विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून पोलिस ठाण्यात
नवा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे रात्री 1 पर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत मिळत असलेल्या वागणुकीबद्दल म्हणणे ऐकून अहवाल बनविण्यात आला. 

Web Title: Mumbai News Marathi News Panvel News saint Joseph high school