आरोपींच्या अटकेच्या महिला आयोगाच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

ठाणे - रिक्षाचालकाकडून 23 वर्षीय तरुणीचे अपहरण करून विनयभंग केल्याच्या घटनेचा विविध स्तरांतून निषेध होत असतानाच, राज्य महिला आयोगाच्या शिष्टमंडळाने पोलिस सहआयुक्त मधुकर पांडेय यांची आज भेट घेऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या; तसेच अशा घटनांना पोलिसांची दिरंगाई कारणीभूत असल्याचा आरोप केला.

ठाण्यात छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला धावत्या रिक्षातून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला होता. या प्रकरणातील आरोपी तीन दिवसांनंतरही फरारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर महिला आयोगाच्या सदस्या ऍड. आशा लांडगे यांच्यासह शिष्टमंडळाने सहआयुक्त पांडेय यांची भेट घेतली.

सुमारे दोन वर्षांपूर्वी ठाण्यातच स्वप्नाली लाड आणि चिपळूण येथील दोघा महाविद्यालयीन युवतींवर असाच प्रसंग गुदरला होता. या घटनांनंतर ठाणे पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून स्मार्ट कार्ड योजना, प्रत्येक रिक्षांत जीपीआरएस सिस्टीम, बारकोड पद्धत, रिक्षाचालकांचे नाव व परवान्याची प्रत समोर लावण्याचे नियम, रिक्षाच्या परमिटची तपासणी आदी योजना राबविण्याचे आश्वासन राज्य महिला आयोगाला दिले होते; मात्र प्रत्यक्षात या योजना राबविण्यात ठाणे पोलिस अपयशी ठरले आहेत. या योजना पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच राबविल्या असत्या, तर असे कृत्य करण्याचे धाडस कोणत्याही रिक्षाचालकाला झाले नसते आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता आली असती, असा दावा महिला आयोगाच्या सदस्यांनी केला. दरम्यान, महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या पालकांची भेट घेऊन आरोपींना कडक शासन करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: mumbai news marathi news women commission thane news