सोमय्या महाविद्यालयात मराठीसाठी आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई - मराठी शिकवणाऱ्या प्राध्यापकाचे एक पद कमी केल्याचा निषेध करत चारशेहून अधिक प्राध्यापकांनी गुरुवारी के. जे. सोमय्या महाविद्यालयाचे आवार दणाणून सोडले. मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी धरणे आंदोलन केले. 

सोमय्याच्या तिन्ही कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने हे आंदोलन केले. के. जे. सोमय्या कनिष्ठ महाविद्यालयात 1960 पासून मराठी विषयासाठी प्राध्यापकांची दोन पदे असताना विद्यार्थी कमी असल्याचे कारण दाखवत महाविद्यालयाने एक पद कमी करून एका प्राध्यापिकेला नोकरीवरून काढून टाकले. या महाविद्यालयात मराठीला संपवण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप संघटनेने केला आहे.

Web Title: mumbai news marathi Somaiya College