माथाडी कामगारांचा उद्या मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

मुंबई - राज्य सरकार माथाडी कायद्याचे अस्तित्व संपवत असल्याचा आरोप ट्रान्स्पोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनने केला आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) हा अधिनियम अमलात आहे. मात्र तरीही सरकारने अजून तीन जीआर काढले आहेत. त्यामुळे हा कायदा आता कमकुवत झाला आहे. त्यामुळे जीआर मागे घेऊन या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, या कायद्यानुसार दाखल खटले निकाली काढण्यासाठी फिरती माथाडी न्यायालये स्थापन करावीत, सर्व हमाल व माथाडी कामगारांना सरसकट निवृत्तिवेतन द्यावे, सरकारी धान्य गोदामांमधील कंत्राटी पद्धत बंद करावी, प्रत्यक्ष कामगार चळवळीत काम करणाऱ्या युनियन प्रतिनिधींनाच मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून घ्यावे, या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
Web Title: mumbai news mathadi employee rally