माथेरान मिनी ट्रेनच्या अडचणी वाढल्या

संतोष पवार
गुरुवार, 29 जून 2017

  • रेल्वे रुळावर ठिकठिकाणी दरडींचा वर्षाव.
  • वॉटर पाईप ते अमन लॉज स्थानक दरम्यान दरडी कोसळल्या.

माथेरान (मुंबई)- एकीकडे मिनीट्रेन सुरु करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या हालचाली सुरु असताना अनेक कारणांनी याला ब्रेक लागत आहे. मुसळधार पावसात माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गात दरडी कोसळल्याने मिनी ट्रेनच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

वर्ष भरापासून बंद असलेली मिनी ट्रेन पुन्हा सुरु करावी यासाठी चारी बाजूनी दबाव वाढत असताना कधी इंजिनामधील त्रुटींमुळे तर कधी डब्यांमुळे मिनीट्रेन सुरु होऊ शकली. मिनीट्रेन पुन्हा सुरु करण्याच्या दृष्टीने तांत्रिक दोष दूर करण्याचे प्रयत्न असताना आता निसर्गाने देखील अडचणी उभी केली आहेत. बुधवारी (ता. 28) माथेरान मध्ये जोरदार पाऊस झाला. चोवीस तासात 226 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत 942 मिलीमीटर पाऊस माथेरानमध्ये पडला आहे. या मुसळधार पावसामुळे अमन लॉज स्थानक ते वॉटर पाईप स्थानक दरम्यान 143 ते 181 पॉईंट क्रमांका दरम्यान रेल्वे रुळावर दरडी कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी रुळावर माती वाहून आली आहे. यामुळे मिनी ट्रेनच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
तीन दिवसांच्या बलात्कारानंतर महिलेस खावे लागले स्वत:चे बाळ...
लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
ऑनलाईन असे जोडा ‘आधार’ आणि ‘पॅन कार्ड’
मी भाजपची आयटम गर्ल; मोदींमुळे लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी
Web Title: mumbai news matheran mini train and rain