सीमा पाटील यांना महिला शाहिरीसाठी महापौर पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

मुंबई - मुंबई महापौर पुरस्कारापाठोपाठ पुणे महापौरचा शाहिरी योगदानासाठी असलेला "लोकशाहीर पठ्ठेबापूराव पुरस्कार' नुकताच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते अभिनेत्री सीमा पाटील यांना देण्यात आला. या वेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, निवड समितीचे सदस्य जयप्रकाश वाघमारे उपस्थित होते. अभिनेत्री, गायिका, निर्माती, नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका, निवेदिका, कलाविष्कार संस्थेची संचालिका असा प्रवास करत त्यांनी महिला शाहीर होण्याचा मान पटकावला.

"हा पुरस्कार मला जरी मिळाला असला तरी तो महाराष्ट्रातील तमाम महिला शाहिरांचा सन्मान आहे,' असे शाहीर सीमा पाटील यांनी पुरस्कार स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त केल्या. जॉली ऑर्केस्ट्राचे सर्वेसर्वा जॉली मोरे यांच्यासोबत संभाजी मोरे, निवृत्ती पाटील, काशिनाथ गुरव, रवींद्र मोरे, रमेश पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे हा मान मिळवणे शक्‍य झाल्याचे त्यांनी सांगितले. सीमा पाटील यांना यापूर्वी महाराष्ट्ररत्न, राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई या पुरस्कारांनीही सन्मानित केले आहे. "कृपासिंधू ब्रह्मांड नायक', "पुणेरी मिसळ', "आकांक्षा', "मंगळसूत्र', "भाग्यलक्ष्मी', या मालिकेत तसेच "तमाशा- हाच खेळ उद्या' या चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून त्यांनी काम केले आहे.

Web Title: mumbai news mayor award to seema patil