मुंबई महापौरांच्या वाहनाला अपघात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मुंबई - महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या सरकारी वाहनाला मंगळवारी (ता. 23) रात्री खेरवाडी परिसरात अपघात झाला. मोटरसायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. या अपघातात मोटरसायकलस्वार किरकोळ जखमी झाला. 

महापौर मंगळवारी सायंकाळी वांद्रे उड्डाणपुलाखालून खेरवाडीच्या दिशेने जात होते. सिग्नल तोडून आलेल्या मोटरसायकलस्वाराचे नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी महापौराच्या वाहनाला धडकली. अपघातात मोटरसायकलस्वार किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. 

Web Title: mumbai news Mayor Vishwanath Mahadeshwar accident