मेडिकल स्टोअरमध्ये क्षयरोगाची औषधे मोफत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

मुंबई - क्षयरुग्णांना वेळच्या वेळी औषधे मिळावीत म्हणून परवानाधारक मेडिकल स्टोअरमध्ये मोफत औषधे मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकार विविध उपाययोजना करीत आहे. यात खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्येही असणार आहेत.

मुंबई - क्षयरुग्णांना वेळच्या वेळी औषधे मिळावीत म्हणून परवानाधारक मेडिकल स्टोअरमध्ये मोफत औषधे मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकार विविध उपाययोजना करीत आहे. यात खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्येही असणार आहेत.

अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सहआयुक्त अर्जुन खडतरे यांनी ही माहिती दिली. केमिस्टना सरकारकडून क्षयाची औषधे देण्यात येतील. औषधे देण्यापूर्वी "एफडीए'तर्फे कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला परवानाधारक केमिस्टची यादी देण्यात आली आहे, अशी माहिती खडतरे यांनी दिली. क्षयरोगावरील औषधे सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतून रुग्णांना मोफत मिळतात; मात्र रुग्णालय घरापासून दूर असल्यास अनेकदा ही औषधे घेण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे औषधोपचारांत खंड पडून आजार बळावू शकतो, हे लक्षात घेऊन ही औषधे मेडिकल स्टोअरमध्ये मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. वितरणाची पद्धत, एका वेळी किती औषधे द्यायची इत्यादी बाबी ठरविण्यात येणार आहेत. साधारण दोन महिन्यांच्या कालावधीत ही औषधे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कळते.

कशी मिळणार औषधे?
डॉक्‍टरने दिलेल्या प्रिस्क्रिप्शन पाहून ही औषधे रुग्णांना देण्यात येतील. संबंधित रुग्णाचे नाव, पत्ता आणि किती औषधे दिली, याची माहिती नोंदवावी लागणार आहे. ही सर्व माहिती तीन वर्षे ठेवावी लागणार आहे, असे केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या रिवाईज नॅशनल टी. बी. कंट्रोल प्रोग्रामचे प्रकल्प संचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी सांगितले.

Web Title: mumbai news medical store Tuberculosis medicine