नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत औषधांचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

तुर्भे - नवी मुंबई महापालिकेने गरीब रुग्णांना मोफत औषधे देण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी, ऐरोली आणि नेरूळ येथील पालिकेच्या रुग्णालयांत औषधांचा तुटवडा जाणवत आहे. अनेकांना बाहेरून औषधे खरेदी करण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने गरीब रुग्णांना भुर्दंड सोसावा लागत आहे.

महापालिकेचे वाशी येथे ३०० खाटांचे रुग्णालय आहे. नेरूळ आणि ऐरोली येथे १०० खाटांचे माता-बाल रुग्णालये, तर महापालिका क्षेत्रात २१ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. आर्थिक स्थिती नसलेल्या रुग्णांना या ठिकाणी मोफत औषधोपचार केले जातात. आरोग्य विभागाकडून अपघातातील निराधार रुग्णांनाही मोफत सेवा दिली जाते. साथ आणि संसर्गजन्य रोगांबाबत, मोफत उपचारांबाबत जाहिरात व फलक लावून जनजागृती केली जाते. ही सेवा घेण्यासाठी रुग्णालय व आरोग्य केंद्रांत गरीब रुग्णांची रोज मोठी गर्दी असते. अनेकदा औषधे नसल्याचे सांगून बाहेरून ती विकत घेण्यास सांगितले जाते; मात्र ती गरीबांना घेता येत नाहीत.

औषधांचा तुटवडा असल्याची समस्या कोणत्याही रुग्णालयात नाही. काही औषधे एकाच आजारासाठी असतात. अशी औषधे मिळण्यात अडचणी येत असतील.
- डॉ. दीपक परोपकारी, वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका

Web Title: mumbai news medicine hospital