ड्रग मार्केटिंगबाबत नवीन अधिसूचना जारी, काय आहे अधिसूचना आणि का होतोय, वाचा 

मिलिंद तांबे
Tuesday, 23 February 2021

"नवे अधिनियम छोट्या औषध उत्पादन कंपन्यांवर अन्यान करणारे आहेत."

मुंबई : औषध जाहिरात विपणनकर्ता एखाद्या अन्य उत्पादनकर्त्याचे उत्पादन विक्री किंवा वितरण करीत असल्यास औषधाच्या गुणवत्तेसह इतर नियमांच्या उल्लंघनासाठी उत्पादनकर्त्यासह तो ही जबाबदार असणार आहे. आरोग्य आणि कुटुंब नियोजन मंत्रालयाने औषध आणि प्रसाधन सामुग्री अधिनियम 1945 मध्ये संशोधन करून हा बदल केला आहे.

औषधांमधील काळाबाजारी रोखण्यासाठी तसेच औषधांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी औषध आणि प्रसाधन सामुग्री नियम 1945 अधिनियमनात काही बदल करण्यात आले आहेत. नवे अधिनियम औषध आणि प्रसाधन सामुग्री नियम 2020 या नावाने ओळखले जाणार असून हे नियम 1 मार्च 2021 पासून लागू होणार आहे. 

महत्त्वाची बातमी : 58 बँक खाती, 171 फेसबुक पेजेस, 5 टेलिग्राम चॅनेल्स आणि 54 मोबाईल्स; सेक्सटॉर्शनच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश

याबाबत ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे  म्हणालेत की, "नवे अधिनियम छोट्या औषध उत्पादन कंपन्यांवर अन्यान करणारे आहेत. मोठ्या कंपन्या या कारवाईतून वाचणार आहेत. आमचा या कायद्यातील बदलला विरोध आहे."

आता जाहिरात विपणनकर्त्याला एखाद्या कंपनीच्या औषधावर आपले लेबल लावून किंवा आपले नाव टाकून त्या औषधाची विक्री आणि वितरण करता येणार नाही. जर एखाद्या जाहिरात विपणनकर्त्याने असे केले तर त्या औषधांच्या गुणवत्ता  किंवा इतर नियमांच्या उल्लंघनासाठी जबाबदार ठरणार आहे. 

महत्त्वाची बातमी : MMRDA च्या प्रकल्पांमुळे मुंबईचा कायापालट होणार; प्रवाशांचा वेळ आणि पैसा बचतीचा मेगाप्लॅन

छोट्या औषध उत्पादक कंपन्या स्वतः औषध उत्पादन न करता मोठ्या कंपन्यांशी करार करतात. त्यावर आपले लेबल किंवा आपल्या ब्रँड चे नाव टाकून त्याचे वितरण तसेच विक्री करतात. मात्र या औषधांमध्ये काही त्रुटी आढळल्यास कारवाई मात्र मोठ्या कंपन्यांवर होत होती. नव्या अधिनियमामुळे आता औषधाच वितरण आणि विक्री करणाऱ्या कंपनीवर देखील कारवाई होणार आहे.

mumbai news medicine marketing and new notification issued by government


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news medicine marketing and new notification issued by government