मुसळधार पावसातही मीरा-भाईंदर पालिकेसाठी मतदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

मतदान प्रक्रियेसाठी  चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.  9 निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील 774 मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यात आली.

मिरारोड : मीरा-भाईंदर महापालिकेसाठी आज रविवार सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीे. सकाळ पासूनच शहरात पावसाने हजेरी  लावल्याने पण अशा पावसातही मतदार घराबाहेर पडून आपले मतदानाचा हक्क बजावत होते.

मतदान प्रक्रियेसाठी  चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.  9 निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील 774 मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यात आली.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 24 प्रभागांमधील 95 वॉर्डसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी एक वॉर्डमधून बिनविरोध निवड झाल्याने, आज 94 वॉर्डसाठीच मतदान होत आहे. एकूण 509 उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. काँग्रेसची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. प्रशासनाने 101 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यातील ५ मतदान केंद्र मीरा रोड येथील आहेत. तर ४ मतदार केंद्र ही भाईदरमधील आहेत. निवडणुकीसाठी शहरात सुमारे 4 हजार 750 पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून तीन दिवस शहरामध्ये 161 पोलीस अधिकारी, 1 हजार 842 पोलीस कर्मचारी आणि 300 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Mumbai news meera bhaindar municipal corporation election