Mumbai Local: आज मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक! मुंबईकरांनो बाहेर पडण्याआधी जाणून घ्या वेळापत्रक

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य-हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
Mumbai Local
Mumbai LocalEsakal

आज ठाणे ते कल्याण पाचवा-सहावा मार्ग आणि कुर्ला ते वाशी या मार्गावर मध्य रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर लोकलच्या फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या उशिराने धावणार आहेत. प्रगती एक्स्प्रेससह अन्य मेल-एक्स्प्रेस उशिराने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरदरम्यान रात्रीच्या ब्लॉक असल्याने पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक असणार नाही.

मध्य रेल्वे

ठाणे - कल्याण

मार्ग - पाचवा आणि सहावा

वेळ - सकाळी ९ ते दुपारी १पर्यंत - या ब्लॉकमुळे पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याणमार्गे वळवली जाणार आहे. तर निर्धारित वेळेच्या १०-१५ मिनिटे उशिराने पोहोचेल. जलद लोकल १०-१५ मिनिटे उशिराने धावणार आहे.

Mumbai Local
एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे; ‘टेट’चा निकाल २० मार्चपूर्वी

हार्बर रेल्वे

कुर्ला - वाशी

मार्ग - अप आणि डाऊन

वेळ - सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१०पर्यंत - सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागात विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.

Mumbai Local
एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे; ‘टेट’चा निकाल २० मार्चपूर्वी

पश्चिम रेल्वे

बोरिवली ते भाईंदर

मार्ग - अप आणि डाऊन जलद

वेळ - शनिवार रात्री ११.४५ ते रविवार पहाटे ४.४५ - ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील काही लोकल रद्द राहणार असून काही उशिराने धावणार आहेत. रात्री घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com