तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

मुंबई - रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नलच्या देखभालीच्या कामांसाठी पश्‍चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी (ता. 4) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या काळात लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील.

मध्य रेल्वे
- ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 पर्यंत ब्लॉक.

- या काळात मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार.
- ब्लॉकच्या काळात डाऊन धीम्या कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली या स्थानकांत थांबणार नाहीत.
- कल्याणहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांत थांबतील.

हार्बर मार्ग
- कुर्ला ते वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक.
- या काळात सीएसटी ते पनवेल, बेलापूर, वाशी दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द.
- सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.

पश्‍चिम रेल्वे
- भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक.
- या काळात धीम्या मार्गावरील लोकल भाईंदर ते वसईदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील.
- काही लोकल रद्द करण्यात येणार

Web Title: mumbai news megablock on three route