नवी मुंबई मेट्रोचे डबे दोन महिन्यांत येणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

नवी मुंबई - नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेच्या डब्यांचा हस्तांतरणाचा कार्यक्रम नुकताच चीनमध्ये झाला. वर्षभरापासून हे डबे बनवण्याचे काम सुरू होते. आता ते पूर्ण झाल्याने दोन महिन्यांत हे डबे नवी मुंबईत दाखल होणार आहेत. 

नवी मुंबईतीन उपनगरे मेट्रोने जोडण्याचा संकल्प सिडकोने केला आहे. सध्या तिचे काम वेगाने सुरू आहे. बेलापूर-पेंधर या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. एक हजार ३०० कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यात २८१ कोटींचे कंत्राट मेट्रोचे डबे बनवण्याचे होते. भारतातील अन्साल्डो कंपनीचा चीन रेल्वे रेंज कॉर्पोरेशनसोबत टायप आहे. त्यांनी वर्षभरापूर्वी हे काम हाती घेतले होते. आता ते तयार झाले असल्याने त्यांचा ताबा सिडकोला शनिवारी (ता. २२) समारंभपूर्वक दिला. या कार्यक्रमासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी स्वतः जाणार होते; परंतु ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे रेल्वेचे काम पाहणारे अधिकारी चीनला गेले होते. हे डबे जहाजाने जेएनपीटीत येतील. तेथून ते तळोजा डेपोत आणले जातील.

Web Title: mumbai news metro