...अन्यथा "चक्का जाम' आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

मुंबई - शहरात मेट्रोच्या कामांमुळे जड वाहनांना सकाळी सात ते मध्यरात्रीपर्यंत प्रवेश बंदी आहे. त्यामुळे रात्रीचे माथाडींचे दर वाहतूकदारांच्या आवाक्‍याबाहेरील असून, नवीन अधिसूचनेची अंमलबजावणी करू नये; अन्यथा 31 मार्चपासून "चक्का जाम' आंदोलनाचा इशारा बॉम्बे गुड्‌स ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने (बीटीए) दिला आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे 1 फेब्रुवारी 2018 पासून सकाळी 7 ते मध्यरात्रीपर्यंत जड वाहनांना बंदी घातली आहे. अवजड वाहनांच्या मुंबईतील प्रवेशावर निर्बंध आणण्यामुळे आवश्‍यक वस्तू आणि मालाच्या किमती वाढणार आहेत; तसेच कामगारांच्या रोजगारावर संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे या धोरणाचा फेरविचार होण्याची आवश्‍यकता असल्याचे संघटनेचे अध्यक्ष विजय रावल यांनी सांगितले.

Web Title: mumbai news metro work heavy vehicle chakka jam agitation