म्हाडा सोडतीला अल्प प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत विविध विभागांतील 819 घरांची सोडत पद्धतीने विक्री करण्यात येणार आहे. ही घरे उच्च आर्थिक उत्पन्न गटासाठी असल्याने सोडतीला खूप कमी प्रतिसाद मिळत आहे. अर्ज सादर करण्यास आठवडा शिल्लक असताना सोमवारी (ता. 16) रात्री 8 वाजेपर्यंत 20 हजार 826 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर सुमारे 48 हजार 250 अर्जदारांची केवळ नोंदणी केली आहे. 

मुंबई मंडळाच्या घरांची सोडत 10 नोव्हेंबरला रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. त्यासाठी 16 सप्टेंबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी केवळ आठ सदनिका असल्याने अर्जदारांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. गत वर्षी 972 घरांसाठी काढलेल्या सोडतीसाठी जवळपास 90 हजार अर्ज होते. यंदा अर्ज भरण्यासाठी 22 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे; मात्र यामध्ये शासकीय सुट्ट्याही अधिक आहेत. त्यामुळे अर्जांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. 

घरांसाठी सोडत : 819 
सोडतीसाठी 48 हजार 250 अर्जदारांनी नोंदणी केली आहे. 
भरलेले अर्ज : 25 हजार 524 
अनामत रकमेसह दाखल अर्ज : 20 हजार 826 
सोडतीची तारीख : 10 नोव्हेंबर 

Web Title: mumbai news mhada