मिलिंद म्हैसकर म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई - मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष म्हणून सरकारने नियुक्‍ती केली आहे. म्हैसकर यांच्याबरोबर आणखी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकारने केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे - डी. बी. गावडे यांची नाशिक येथे आदिवासी सहायक आयुक्‍तपदी, नगर महापालिका आयुक्‍त पदी जी. सी. मांगले यांची, तर व्ही. व्ही. माने यांची नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्‍ती केली आहे; तर नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून रवींद्र बिनवडे यांची नियुक्‍ती सरकारने केली आहे.
Web Title: mumbai news milind mhaiskar mhada chief Executive Officer