मीरा भाईंदरमध्ये फुलले कमळ

bjp flag
bjp flag

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयाची परिक्रमा कायम ठेवत मुंबई जवळील मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर भाजपने विजयी झेंडा फडकला आहे. आज (सोमवार) झालेल्या मतमोजणीत एकूण ९५ पैकी ५४ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही. शिवसेनेच्या जागा थोड्या वाढल्या असल्या, तरी भाजपने निवडणुक एकहाती जिंकल्याने सेना विरोधी बाकांवर बसणार आहे. मनसे आणि स्थानिक बहुजन विकास आघाडीला यश मिळाले नाही. काँग्रेसला ८ जागांवर फटका बसला आहे.

रविवारी मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी ४७ टक्के मतदान झाले होते. आज मजमोजणीच्या सुरवातीपासून भाजप आघाडीवर होती. दुपारपर्यंत हाती आलेल्या माहीतीनुसार भाईंदर महापालिकेच्या 94 जागांपैकी भाजपने ६१ जागा मिळवल्या. काँग्रेस १०, शिवसेना २२, आणि अपक्षांना २ ठिकाणी विजय मिळाला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. मीरा भाईंदर महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत भाजपानंच सर्वाधिक 32 जागा मिळवल्या होत्या, मात्र त्याच वेळी काँग्रेसनं 18 आणि राष्ट्रवादीने 26 जागा मिळवून अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. पहिल्या अडीच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, अपक्षांची सत्ता होती. मात्र त्यानंतर पुन्हा शिवसेना आणि भाजपानं सत्ता खेचून आणली होती. नंतरच्या अडीच वर्षात भाजपा, शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी बहुजन विकास आघाडी, अपक्षाची सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. भाजपाच्या विजयानं पुन्हा एकदा राजकी द्वंद्व सुरु झाले असून, भाजप खा. किरीट सोमय्या आणि आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

मीरा भाईंदर मनपा जाहीर निकाल :
भाजप - ६१
काँग्रेस - १०
शिवसेना - २२
राष्ट्रवादी - ०
अपक्ष - २

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com