काझी सत्तार, जाफरी यांना 'मिर्झा गालिब जीवनगौरव'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

मुंबई - उर्दू भाषेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीमार्फत देण्यात येणाऱ्या "मिर्झा गालिब जीवनगौरव' पुरस्कारासाठी काझी अब्दुल सत्तार व फुजैल जाफरी यांची निवड झाली आहे. येत्या 13 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केले जातील.

उर्दू साहित्य अकादमीच्या 2015 आणि 2016 च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 2015 साठी 59 व 2016 साठी 57 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. काझी अब्दुल सत्तार यांना 2015 व फुजैल जाफरी यांना 2016 चा "मिर्झा गालिब जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे, तर "वली दखनी' राज्य पुरस्काराने काझी मुश्‍ताक अहमद, वकील नजीब यांना सन्मानित करण्यात येणार आहे. नवोदित साहित्य पुरस्कार याह्या जमील आणि असवद गौहर यांना, तर ले-आउट डिझायनिंगसाठी नाजीर नोमान सिद्धिकी मोहनामा शाईर आणि इश्‍तियाक अहमद यांना जाहीर झाला आहे.

पत्रकारिता पुरस्काराने सय्यद महम्मद अब्बास, असीम जलाल, अन्सारी असगर जमील, काझी मखदूम, मुशर्रफ शमसी, रफीक अहमद मुश्‍ताक, मुन्शी मोहम्मद, मेराज अन्वर आदींना सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: mumbai news mirza galib jeevangaurav award