स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलुंडमध्ये मनसेकडून वाघा बॉर्डरची प्रतिकृती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

भांडुप - स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलुंडमधील मेहुल सर्कलजवळ मनसेच्या सोहळ्याला नागरिकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. या वेळी मनसेकडून साकारण्यात आलेल्या वाघा बॉर्डरच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले.

भांडुप - स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलुंडमधील मेहुल सर्कलजवळ मनसेच्या सोहळ्याला नागरिकांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. या वेळी मनसेकडून साकारण्यात आलेल्या वाघा बॉर्डरच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुलुंड अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्यातर्फे दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष सोहळा करण्यात येतो. प्रभात फेरी काढून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मनसेचे नेते शिरीष सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी केलेले ड्रिल सगळ्यांच्या कौतुकाचा विषय बनला. अमर जवान स्मारकाला आदरांजली वाहून सैनिकांना मानवंदना देण्यात आली. या सोहळ्याला मुलुंडकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून एक साथ राष्ट्रगान केले. या सोहळ्याला पोलिस उपनिरीक्षक विक्रम पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक दीपक वारके, तसेच मनसेचे सर्व उपाध्यक्ष, कार्यकर्ते हजर होते. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात दिल्लीच्या लाल किल्याची प्रतिकृती बनवण्यात आली होती.

Web Title: mumbai news mns