फुटीर नगरसेवकांची नोंदणी करू नये 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई  - भाजप आणि मनसेमध्ये रविवारी गुफ्तगु झाल्यानंतर अचानक शिवसेनाविरोधी हालचालींना वेग आला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केल्यानंतर सोमवारी (ता. 16) मनसेच्या नेत्यांनी कोकण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन सहा नगरसेवकांची नोंदणी करू नये असे पत्र त्यांना दिले. 

मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याचे शुक्रवारी (ता. 13) दुपारीच स्पष्ट झाले होते; मात्र त्यानंतर शनिवारपर्यंत राज ठाकरे कोणतीच भूमिका जाहीर करत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही परदेश दौऱ्यावर होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांनी रविवारी सकाळी राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर अचानक चक्रे फिरू लागली. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव यांच्यावर टीका करताना ही फोडाफोडी कधीच विसरणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर आज मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यांनी कोकण आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. फुटीर नगरसेवकांची नोंदणी करू नये असे पत्र त्यांनी दिले. 

ते सहा जण मनसेतच 
कोकण आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर आहेत. ते दिवाळीनंतर कामावर रुजू होणार असल्याचे समजते. त्यामुळे फुटीर नगरसेवकांची नोंदणी प्रक्रिया दिवाळीनंतरच सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सहाही नगरसेवक तांत्रिक दृष्ट्या मनसेतच आहेत. 

Web Title: mumbai news MNS