मध्य रेल्वेवर 24 मोबाईल तिकीट व्हेंडिंग मशीन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - तिकीट खिडकी व एटीव्हीएम मशीनसमोरील रांगा कमी व्हाव्यात, यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांत 24 मोबाईल तिकीट व्हेंडिंग मशीन बसवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांवर ही मशीन बसवण्यात आली आहेत. 

वाढत्या शहरीकरणामुळे लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सर्वच स्थानकांवर तिकिटांसाठी रांगा लागलेल्या असतात. त्यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेने हे मशीन बसवल्या आहेत. सीएसएमटीवर चार; तर घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांत प्रत्येकी पाच मशीन बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना तिकीट खिडकी, एटीव्हीएम, स्मार्ट कार्ड, अधिकृत एजंट यांसह आता मोबाईल तिकीट व्हेंडिंग मशीनच्या माध्यमातूनही तिकीट घेता येणार आहे. 

Web Title: mumbai news Mobile Ticket Vending Machine