मोनोचा अपघात टळला; चेंबूरला एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

मानोच्या अपघाताची अफवा 
चेंबूर स्थानका जवळ मोनो रेल्वे समोरा समोर आल्याची चर्चा होती.मात्र,एक गाडी बंद पडल्याने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी दुसरी गाडी पाठविण्यात आली होती.तसेच रविवार सकाळ पासून मोनो सुरळीत सुरु होईल असा दावा मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने केला आहे. 

मुंबई : मोनो रोलचा मोठा अपघात शनिवारी रात्री थोडक्‍यात टळला.एक ट्रॅक विद्युत पुरवठा नसल्याने बंद होता.यामुळे चेंबूर स्थानकाजवळ एकाच ट्रॅकवर दोन मोनो समोरासमोर आल्या.रविवारी सकाळी मोनोरेल सुरळीत सुरु होईल अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. 

मोनोच्या दोन पैकी एका ट्रॅकचा विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्या असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.प्रवाशाना बाहेर काढण्यासाठी रेस्क्‍यू ट्रेन पाठविण्यात आली होती.मात्र, मोनो निम्मी स्थानकात असल्याने प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.दोन वर्षांपुर्वी वडाळा येथे अशाच प्रकारे विज पुरवठा खंडीत झाल्याने काही सात प्रवासी मोनो मध्ये अडकले होते.त्यांना अग्निशमन दलाच्या शिडीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले होते.  

मोनोच्या अपघाताची अफवा 
चेंबूर स्थानका जवळ मोनो रेल्वे समोरा समोर आल्याची चर्चा होती.मात्र,एक गाडी बंद पडल्याने प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी दुसरी गाडी पाठविण्यात आली होती.तसेच रविवार सकाळ पासून मोनो सुरळीत सुरु होईल असा दावा मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने केला आहे. 

चेंबूर स्थानका जवळ मोनोच्या दोन ट्रेन समोरा समोर आल्याने अपघाताची अफवा पसरली होती.मात्र,अचानक विज पुरवठा खंडीत झाल्याने एक ट्रेन बंद पडली होती.त्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी दुसरी ट्रेन पाठवली.मात्र,ट्रेन निम्मी रेल्वे स्थानकात असल्याने प्रवाशांना सुरळीत बाहेर काढण्यात आले असल्याचे एमएमआरडीए कडून सांगण्यात आले.अडीज वर्षांपुर्वी अशाच प्रकारे विज पुरवठा खंडीत होऊन वडाळा येथे मोनो काही तास बंद पडली होती.तेव्हा अग्निशमन दलाच्या शिडीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

Web Title: Mumbai news mono rail accident