मोजोस बिस्ट्रोचा मालक पाठकला पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

मुंबई - कमला मिल कंपाउंडमधील दुर्घटनेप्रकरणी मोजोस बिस्ट्रोचा मालक युग पाठक याला न्यायालयाने 12 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

मुंबई - कमला मिल कंपाउंडमधील दुर्घटनेप्रकरणी मोजोस बिस्ट्रोचा मालक युग पाठक याला न्यायालयाने 12 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

महापालिकेच्या प्राथमिक अहवालात हुक्‍क्‍याच्या कोळशामुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलिस हुक्का पार्लर विभागातील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहेत. मोजोसच्या एका भागातील पडद्यांनी पेट घेतला आणि नंतर आग भडकली असा निष्कर्ष या अहवालात आहे. पबमधील ग्राहक, सुरक्षारक्षक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहिती आणि चित्रफितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. महापालिकेने यापूर्वी मोजोस बिस्ट्रोच्या छतावरील प्लॅस्टिकच्या बेकायदा शीट काढून टाकल्या होत्या. त्याबाबतची माहिती घेण्यासाठी पोलिस संबंधित पालिका कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवणार आहेत. दुर्घटनेच्या प्रत्यक्षदर्शींकडूनही माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कमला मिल कंपाउंडमधील आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. महापालिकेच्या अहवालानंतर शनिवारी पोलिसांनी मोजोस बिस्ट्रोचे मालक युग पाठक आणि तुली यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पाठक हा माजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. तुलीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: mumbai news Mosaic Bistro fire kamla mill compund fire