मोदी व फडणवीस सरकार विरुद्ध आंदोलन

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई: दक्षिण मुंबई वरळी विधानसभा क्षेत्रातील कामगार विभाग म्हणून सुपरिचीत असलेल्या कबड्डी खेळाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीरोड नाका येथे मोदी सरकार, फडणवीस सरकार यांच्या विरोधी घोषणा देत देशभरात महागाईने घातलेल्या थैमाना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे सोमवारी (ता. 9) सायंकाळी निदर्शने करण्यात आली.

सरकारचा धिक्कार करीत केलेल्या आंदोलनात महिलांची संख्या मोठी होती. माजी मंत्री सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शना खाली राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात महगाई बाबत करण्यात आलेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यानी शरद पवार झिंदाबाद चा नारा देत केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. वरळी तालुक्‍यातील तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बबन कनावजे, रविन्द्र मयेकर, अंकुश पालसे, निवृत्ती देसाई, इंदुमती खांडेकर, वैजयंती दोरुगडे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यानी भाववाढ, महागाई वाढ विरुद्ध घोषणा देत आपला निषेध नोंदविला.

ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे वपोनि अहमद पठाण यांच्या आदेशानुसार बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी आदिनाथ अहिरे, अधिकारी व कर्मचारी यांनी काही आंदोलकांना ताब्यात घेवून दंड आकारुन सोडून दिले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news Movement Against Government