एमपीएससी प्रवेशावर बंदी कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

मुंबई  - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेश प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती आज महाराष्ट्र प्रशासकीय आयोगानेही कायम ठेवली.

मुंबई  - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेश प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती आज महाराष्ट्र प्रशासकीय आयोगानेही कायम ठेवली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून "एमपीएससी'ची परीक्षा वादात सापडलेली आहे. याबाबत मॅटने सुनावणी घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते, तसेच ज्यांचे अर्ज दाखल आहेत त्यांच्या अर्जावर दोन आठवड्यांमध्ये आणि नव्या तक्रारींवर चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. आरक्षित गटातील उमेदवारांनी खुल्या गटातून अर्ज केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले, असा आरोप जनहित याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

Web Title: mumbai news mpsc admission ban