सव्वा कोटीचे सोने विमानतळावर जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

मुंबई - सोन्याची तस्करी करणाऱ्या एका महिलेसह दोन प्रवाशांना हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) सहार विमानतळावर अटक केली. तिघांकडून सव्वा कोटीचे सोने जप्त करण्यात आले आहे. 

मुंबई - सोन्याची तस्करी करणाऱ्या एका महिलेसह दोन प्रवाशांना हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) सहार विमानतळावर अटक केली. तिघांकडून सव्वा कोटीचे सोने जप्त करण्यात आले आहे. 

बॅंकॉक व दुबईहून सोन्याची तस्करी वाढू लागली आहे. बुधवारी (ता.21) बॅंकॉकहून सहार विमानतळावर उतरलेल्या रविकिरण गोहेल या एका प्रवाशाला चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे 60 लाखांचे सोने सापडले. त्यानंतर विमानतळावर निमिषा गुदका या महिलेला ताब्यात घेतल्यावर तिच्याकडे 20 लाखांचे सोने सापडले. ती दुबईहून आली होती. तिचा इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणांचा व्यवसाय आहे. हे दोघेही गुजरातचे रहिवासी आहेत. तिसऱ्या कारवाईत दुबईहून आणलेले 35 लाखांचे सोने जप्त करण्यात आले. दोन प्रवाशांनी अटकेच्या भीतीमुळे हे सोने विमानाच्या स्वच्छतागृहामध्ये टाकून पलायन केले आहे. सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून या दोघांचा शोध घेतला जात आहे. 

Web Title: mumbai news mumbai airport gold