गृहनिर्माण संस्थांना "बिल्डर' करण्यासाठी मुंबै बॅंकेचे अर्थसाह्य 

गृहनिर्माण संस्थांना "बिल्डर' करण्यासाठी मुंबै बॅंकेचे अर्थसाह्य 

मुंबई - गृहनिर्माण सोसायट्यांना विकसक होण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मुंबई बॅंकेच्या स्वयं-पुनर्विकास योजनेचे सादरीकरण नुकतेच बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर केले. 

गृहनिर्माण संस्थांकडून येणाऱ्या प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी देण्यात येईल. त्यासाठी एक खिडकी योजना राबविण्याची तयारीही म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी दर्शविली. त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळणार असून मुंबईतील सुमारे 10 हजारपेक्षा जास्त गृहनिर्माण सोसायट्यांना त्याचा फायदा होईल. 

विकसकांच्या मनमानीमुळे मुंबईतील हजारो पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत. रहिवाशांनी एकत्र येऊन स्वतःच इमारतींचा पुनर्विकास केल्यास त्यांना मोठी घरे मिळतील. इमारतीचे बांधकामही दर्जेदार होईल आणि कामही वेळेत पूर्ण होऊन घराचा ताबा लवकर मिळेल. शिवाय, अतिरिक्त एफएसआयच्या विक्रीतून बिल्डरऐवजी सोसायटीला नफा मिळेल. सोसायट्यांना विकसक बनविण्यासाठी मुंबई बॅंकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांना आवश्‍यक ते अर्थसाह्य कमी व्याजदराने पुरवण्याची योजना बॅंकेने आखली आहे. 

या योजनेचे सादरीकरण मुंबई बॅंकेने म्हाडाच्या अधिकाऱ्यांसमोर सोमवारी केले. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी सुभाष लाखे यांच्यासमोर हे सादरीकरण करण्यात आले. या वेळी बॅंकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, संचालक नंदकुमार काटकर, नितीन बनकर, आनंदराव गोळे, विठ्ठल भोसले आणि सरव्यवस्थापक डी. एस. कदम उपस्थित होते. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही सादरीकरण करण्यात आले. ही योजना सरकारी योजना म्हणून जाहीर करावी, अशी मागणी बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com