रूळाला तडे गेल्याने मुंबईतील हार्बर लाईन विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

रूळाला तडे गेल्याने आज (मंगळवार) मुंबईतील हार्बर लाईनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई : रूळाला तडे गेल्याने आज (मंगळवार) मुंबईतील हार्बर लाईनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

आज दुपारी साडे बाराच्या सुमारास डॉकयार्ड ते रे रोडदरम्यान रूळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हार्बर सेवा विस्कळीत झाली आहे. रूळ दुरूस्तीचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. हार्बर लाईन विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Web Title: mumbai news mumbai breaking news mumbai local harbour line train service railway timetable marathi news