आर्थिक फसवणूक झालेल्यांना पैसे परत मिळणार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

पूर्वी ही रक्कम मिळवण्यासाठी फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांना अनेक कार्यालयांमध्ये चपला झिजवाव्या लागायच्या. आता त्यांचा त्रास कमी करून वन विंडो सिस्टीमनुसार ही रिफंड सेल काम करणार आहे.

मुंबई : आर्थिक गुन्हे शाखेत (ईओडब्ल्यू) स्थापन होणारी नवी रिफंड सेल पहिल्या टप्प्यात फसवणूक झालेल्या 489 कोटी रुपयांचे गुंतवणुकदारांना वाटप करणार आहे. या सेलच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून लवकरच भायखळा वाहतूक पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे ही रिफंड सेल कार्यरत होणार आहे. वर्षभरात या सेलच्या माध्यमातून 3500 कोटींचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त 'दै. सकाळ'ने सर्वप्रथम 29 मेच्या अंकात प्रसिद्ध केले होते. 

मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या रिफंड सेलच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून तिचे काम लवकरच सुरू होईल, असे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. रिफंड सेल पहिल्या टप्प्यात 489 कोटी रुपयांचे वितरण करणार आहे. 1988 ते 2005 या कालावधीतील गुंतवणूकीच्या फसवणुकीच्या 11 प्रकरणांमध्ये मालमत्तांचा लिलाव करून त्यातून ही रक्कम जमा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ज्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमधील रकमेचे वाटप करण्यात येणार आहे. त्याबाबतची यादी लवकरच ईओडब्ल्यू जारी करणार आहे. 

पूर्वी ही रक्कम मिळवण्यासाठी फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांना अनेक कार्यालयांमध्ये चपला झिजवाव्या लागायच्या. आता त्यांचा त्रास कमी करून वन विंडो सिस्टीमनुसार ही रिफंड सेल काम करणार आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाचा अधिकारी या सेलचा प्रमुख असणार असून त्याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दोन उपनिरीक्षक व आठ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय एक चारचाकीसह दुचाकीही वाहनेही या सेलला पुरवण्यात येणार आहेत.

1988 ते 2005 या कालावधीतील फसवणुक झालेल्या गुंतवणूकदारांनी बरीच वर्ष या रकमेची वाट पाहिली होती. त्यांना कमी त्रासामध्ये त्यांचे हक्काचे पैसे मिळावे, यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने हे पाऊल उचलले आहे.

आर्थिक गुन्ह्यांचा तपास करत असताना तपास अधिकारी आरोपीने गुन्ह्यांतील फसवणुकीच्या रकमेपासून विकत घेतलेल्या मालमत्तेची माहितीही घेतो. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार या मालमत्तेवर टाच आणली जाते. पुढे न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिका-यांच्या मार्फत (बहुधा उप जिल्हाधिकारी) या मालमत्तेचा लिलाव होऊन ती रक्कम तक्रारदार गुंतवणुकदारांना परत करण्यात येते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेस नेते बाबा सिद्दिकींच्या निवासस्थानी छापे
महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदीसाठी 12 जूनला कर्नाटक बंद
इंदापूरजवळ अपघातात दोन जण ठार
गोवळकोट किल्ल्यावरील तोफांचे पुनर्वसन
काबूलमधील स्फोटात 80 ठार; 300 जखमी

Web Title: Mumbai news Mumbai crime news EOW Mumabi Police commissioner Dattatray Padsalgikar