पावसामुळे चार मुंबईकर चौघेजण बुडाल्याची भीती; शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

मढ जेट्टी येथे गणेश विसर्जनासाठी गेलेला चिन्नू शहा (17) हा पाण्यात बुडाला.

मुंबई : पावसामुळे मुंबईकरांचे कंबरडे मोडले असतानाच चौघेजण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

दहिसर पूर्व येथील कोकणी पाड्यातील शिंगटे कंपाऊंट येथील नाल्यावरील लाकडी पुल तुटल्यामुळे गौरेश उघडे व प्रतिक घाटाळ हे नाल्यात पडले. त्यातील उघडेला वाचवण्यात यश आले आहे. घाटाळ मात्र पाळ्यासोबत वाहून गेला. त्याचा शोध सुरू आहे.

आणखी एका घटनेत समता नगर येथे नाल्यात पडलेली सायकल काढण्यासाठी नाल्यात ओमप्रकाश निर्मल याने मंगळवारी रात्री उडी मारली. पण पाण्यासोबत तो वाहून गेला. तो रात्री उशीरापर्यंत सापडला नाही. याशिवाय मढ जेट्टी येथे गणेश विसर्जनासाठी गेलेला चिन्नू शहा (17) हा पाण्यात बुडाला. अग्निशमन दल रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध घेत होते. तसेच एलफिन्स्टन येथे गटारात मंगळवारी रात्री एक 55 वर्षीय व्यक्ती वाहून गेला. त्याची माहिती मुख्य नियंत्रण कक्षाला देण्यात आली असून अद्याप सापडला नाही. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

 

Web Title: mumbai news mumbai rains four drowned