पदव्युत्तर प्रवेशांसाठी पुन्हा 25 पर्यंत मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईमुळे पदव्युत्तर प्रवेशांनाही पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वीची मुदत 15 सप्टेंबर अशी होती. आता आणखी 10 दिवस म्हणजे 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईमुळे पदव्युत्तर प्रवेशांनाही पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यापूर्वीची मुदत 15 सप्टेंबर अशी होती. आता आणखी 10 दिवस म्हणजे 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

विद्यार्थी संघटनांनी पदव्युत्तर प्रवेशांना मुदतवाढ देण्याची मागणी प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे केली होती; परंतु मुदतवाढीबाबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. पदव्युत्तर वर्ग लवकर सुरू झाले, तरच नोव्हेंबरमध्ये सत्र परीक्षा घेता येईल, असा मतप्रवाह असलेला मोठा अधिकारी वर्ग होता; परंतु मुदतवाढ दिली नाही तर पुन्हा विद्यार्थी संघटना आक्रमक होतील, अशी शक्‍यता गृहीत धरून विद्यापीठाने मुदतवाढीचा निर्णय घेतला. हा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय आणि उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील प्रवेशांना लागू नसेल. 

विद्यार्थ्यांचे निकाल संकेतस्थळावर आहेत; परंतु अजूनही गुणपत्रिका न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निकालांच्या मुद्रित प्रती किंवा पदव्युत्तर परीक्षांच्या गॅझेट्‌सच्या फोटोकॉपीच्या आधारावर प्रवेश द्यावा, अशा सूचना मुंबई विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना दिल्या आहेत. विद्यापीठाचे पाच निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीत.

Web Title: mumbai news mumbai university