कुलगुरूपदासाठी 64 अर्ज 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी 64 जणांचे अर्ज आले आहेत. प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी या पदासाठी अर्ज केलेला नसल्याचे समजते. 

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी 64 जणांचे अर्ज आले आहेत. प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी या पदासाठी अर्ज केलेला नसल्याचे समजते. 
निवड झालेल्या उमेदवारांना मार्च महिन्यात मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यापैकी पाच उमेदवारांची नावे राज्यपाल भवनाला कळवण्यात येतील. नंतर शोध समितीकडून एप्रिलमध्ये त्यांची मुलाखत घेतली जाईल. त्यामुळे मे महिन्यापर्यंत विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळतील, अशी आशा आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी गेल्या वर्षी 25 ऑक्‍टोबरला बडतर्फ केले होते. दुसऱ्याच दिवशी नव्या कुलगुरूंचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीवर के. कस्तुरीरंगन, भूषण गगराणी आणि श्‍यामलाल सोनी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Web Title: mumbai news mumbai university Chancellor