मुंबई विद्यापीठ: रखडलेल्या निकालांविरोधात उद्या पुन्हा आंदोलन होणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

प्रभारी कुलगुरू डॉ देवानंद शिंदे कोल्हापुरात असल्याने आज आंदोलन मागे घेण्यात आले. आजच्या आंदोलनाचे नेतृत्व   माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी केले. पुनर्मुल्यांकन तसेच प्रलंबित निकाल जाहीर झाल्याशिवाय विद्यापीठात सत्र परीक्षा होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका विद्यार्थी संघटनांनी मांडली

मुंबई  - रखडलेल्या निकालांविरोधात मुंबई विद्यापीठात मंगळवारी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले. मात्र प्रभारी कुलगुरू डॉ देवानंद शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे उद्या पुन्हा आंदोलन छेडले जाणार आहे. 

प्रभारी कुलगुरू डॉ देवानंद शिंदे कोल्हापुरात असल्याने आज आंदोलन मागे घेण्यात आले. आजच्या आंदोलनाचे नेतृत्व   माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी केले. पुनर्मुल्यांकन तसेच प्रलंबित निकाल जाहीर झाल्याशिवाय विद्यापीठात सत्र परीक्षा होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका विद्यार्थी संघटनांनी मांडली. आंदोलन चिघळल्याने अखेर परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉ अर्जुन घाटुळे , प्रभारी प्र- कुलगुरू डॉ धीरेन पटेल, प्रभारी कुलसचिव डॉ दिनेश कांबळे यांनी आंदोलनकर्त्याँची भेट घेतली. कुलगुरू डॉ शिंदे अपरिहार्य कारणांमुळे कोल्हापुरात असल्याने मागण्यांवर निर्णय घेण्यास थोडा वेळ लागेल अशी विनंती प्रभारी प्र-कुलगुरू डॉ धीरेन पटेल यांनी केली . त्यामुळे उद्या फोर्ट संकुलात विद्यार्थी संघटना आपल्या मागण्या डॉ शिंदे यांच्यासमोर मांडणार आहेत.

उद्या डॉ शिंदे यांनी हजर राहावे अन्यथा मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही फोर्ट संकुलातून हलणार नाही असा इशारा  माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी दिला.

Web Title: mumbai news: mumbai university education