...अन्यथा विद्यार्थ्यांच्या अक्रोशास सामोरे जा

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

मुंबई: विद्यापिठ प्रशासनाने शुल्कवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या अक्रोशास सामोरे जायला तयार राहावे, असा इशारा आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने कुलगुरूंना दिला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये असंतोष असतानाच विद्यापीठाने चालू सत्रापासून "परिक्षा शुल्क" (Exam Fee) वाढ केली आहे. यामुळे फी तब्बल 900 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. ही फीवाढ अन्यायी आहे आणि ती कित्येक मुलांच्या शिक्षणावर गंडांतर आणणारी आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला शिक्षणापासून परावृत्त करण्याचा हा डाव आहे. अससेसमेंटच्या खर्चवाढिचे करण दाखवत ही फीवाढ लादण्यात आली आहे.

संघटनेने Online assesment ने त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया मांडणारे उपरोधीत पत्र "सुट्टीवर असलेल्या कुलगुरूंच्या" नावे लिहुन आपलं म्हणणं मांडले आहे. P.G कोर्सेस च्या ऍडमिशन ची Deadline संपली आहे. अनेक विद्यार्थी सदोष निकाल प्रक्रियेने बाधित झाल्याने त्यांचे निकालच राखडल्याने प्रवेशापासून वंचित आहेत. त्यासाठीही प्रवेशाची अतिरिक्त फेरी घेण्यात यावी, अशी मागणी संघटनेने कुलगुरूंकडे केली.

M.fil,PH.d व reserch करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारी फेलोशिप नियमितपणे मिळत नाही. अर्थात, विद्यापीठाकडून त्याचा पाठपुरावा होत नाही यावरून संशोधनाविषयी असलेली विद्यापीठाची उदासीन भूमिका स्पष्ट होते. सदरची फेलोशिप नियमितपणे मिळावी आणि उर्वरित निकाल लवकरात लवकर लावण्यात यावे यांसह अनेक मागण्यांचे निवेदन आंबेडकर स्टुडंट असोसिएशनने कुलगुरूंना दिले आहे. यावेळी उपस्थित संघटनेचे अध्यक्ष सचिन मानवडकर, पौर्णिमा थोरवडे, राघवेंद्र, शुभम सोनवणे, जिजा ईप्पर, बुद्धभूषण, रोहित, शिवराज, प्रियांका, शुभम, चिदानंद व इतर कार्यकर्ते यांनीही आपले योगदान दिले.

Web Title: mumbai news mumbai university fee issue