पदव्युत्तर मायक्रोबायॉलॉजी परीक्षा आता 9 फेब्रुवारीपासून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुंबई - अभ्यासक्रमासाठी वेळ न देता परीक्षांचा घाट घालणाऱ्या मुंबई विद्यापीठावर पुन्हा परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली आहे. आता विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर मायक्रोबायॉलॉजी विषयाची परीक्षा 9 फेब्रुवारीपासून सुरू होईल, असे मुंबई विद्यापीठाने मंगळवारी सकाळी जाहीर केले. 

मायक्रोबायॉलोजीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा एकही वर्ग भरला नसताना आजपासून (ता. 23) परीक्षा सुरू होणार होत्या. अभ्यासक्रम शिकवला नसताना परीक्षा द्यावी लागणार असल्याने विद्यार्थी रडकुंडीला आले होते. याबाबत युवा सेनेने गेल्या आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संचालकांची भेट घेऊन पुढे ढकलण्याची मागणीही केली होती. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनावर दबाव वाढला. अखेर मंगळवारी परीक्षा सुरू होण्याआधी सकाळी मायक्रोबायॉलोजी विषयाच्या पदव्युत्तर सत्र एकच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे शहाणपण मुंबई विद्यापीठाला सूचले. या परीक्षा 17 दिवस पुढे ढकलण्यात येत असल्याचे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले. 

नव्या वेळापत्रकानुसार, मायक्रोबायॉलोजी पेपर 1 (सेल बायोलॉजी ऍण्ड व्हायरोलॉजी) 9 फेब्रुवारीला होणार आहे. 25 जानेवारी रोजी होणारा मायक्रोबायॉलोजी पेपर 2 मायक्रोबाअल जेनेटिक्‍स -1 हा 12 फेब्रुवारीला होईल. 29 जानेवारीला घेण्यात येणारा पेपर 3 मायक्रोबायॉलोजी बायोकेमिस्ट्री 14 फेब्रुवारी रोजी, तर मायक्रोबायॉलोजी पेपर 4- मेडिकल मायक्रोबायॉलोजी इम्युनिओलॉजी- 1 हा 31 जानेवारीऐवजी 16 फेब्रुवारीला होणार आहे.

Web Title: mumbai news mumbai university Microbiology exam