मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव पुन्हा बदलले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

डॉ. दिनेश कांबळे यांची प्रभारी कुलसचिव पदी नियुक्ती

मुंबईः मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव पदी पुन्हा नव्या अधिका-याची बदली करण्यात आली आहे. विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ दिनेश कांबळे यांना प्रभारी कुलसचिव पदावर आज (गुरुवार) नियुक्त करण्यात आले.

डॉ. दिनेश कांबळे यांची प्रभारी कुलसचिव पदी नियुक्ती

मुंबईः मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव पदी पुन्हा नव्या अधिका-याची बदली करण्यात आली आहे. विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ दिनेश कांबळे यांना प्रभारी कुलसचिव पदावर आज (गुरुवार) नियुक्त करण्यात आले.

कुलसचिव पद रिक्त असल्याने काही दिवसांपूर्वीच किर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू मगरे यांची या पदाचा प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र ते हजरच न झाल्याने अखेर नवा अधिकारी कुलसचिव पदावर नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांची हज समितीवर नियुक्ती झाल्यानंतर या पदावर कोण येणार याबाबत विद्यार्थी संघटनांनी वाद निर्माण केला होता.

मुंबई विद्यापीठाच्या विशेष कक्षाचे उपकुलसचिव यांची नियुक्ती अखेर या पदावर प्रभारी कार्यकाळासाठी करण्याचा निर्णय झाला. त्याबाबतचे परिपत्रक गुरुवारी मुंबई विद्यापीठाने काढले. प्रभारी कुलसचिव हा अतिरिक्त भार म्हणून डॉ. दिनेश कांबळे सहा महिने कार्यभार सांभाळतील. या दरम्यान कुलसचिव पदाच्या जाहिरातीतून आलेल्या अर्जांपैकी अंतिम प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, माजी कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांची नियुक्ती हज समितीवर झाल्यानंतर या पदावर उपकुलसचिव डॉ दिनेश कांबळे किंवा गरवारे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ अर्निक कर्णिक यांच्या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्‍यता वर्तवली जात होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पाकसोबत मैत्री केल्यास काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल - अब्दुल्ला
महिलेच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान
गिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची दौलतजादा ! 
माझ्यावर आरोप करण्यात काहींना आनंद वाटतो - खडसे
गुजरात सरकारची 'ब्लू व्हेल'वर बंदी
जुहू येथील इमारतीला आग; पाच जणांचा मृत्यू
ठाणे: कळव्यात महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
जनसागर लोटला
दोन्ही देशांचे हित एकातच : नरेंद्र मोदी
गणेश विसर्जनादरम्यान राज्यात 16 जणांचा मृत्यू
ब्रॅण्डबाजा! (ढिंग टांग!)

Web Title: mumbai news mumbai university new Registrant dr dinesh kamble